तुम्हीही करू शकता अंतराळ प्रवास! 'या' भारतीयाने रचला इतिहास

सकाळ वृत्तसेवा

अंतराळात जाऊन येणे हा विचार किती उत्साही आणि प्रेरणादायी वाटतो ना ! बालपणात शाळेत विज्ञानाचे धडे शिकताना आपणदेखील अवकाशात जाव अस प्रत्येकाला वाटायच.

अवकाशात जाण्याच हेच स्वप्न एका भारतीय व्यक्तीने पूर्ण करून दाखवलय.

गोपी थोटाकुरा हे भारतीय उद्योजक आणि वैमानिक अंतराळातील प्रवास करणारे पहिले भारतीय बनले आहेत. अवकाशात प्रवास करून इतिहास रचणारी ही व्यक्ति मुळची आंध्रप्रदेशची आहे.

अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्या ब्लू ओरिजिन कंपनीच्या एनएस-२५ मिशनद्वारे ते अंतराळात गेले होते.

भारताचे पहिले अंतराळयात्री राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळात जाणारे ते दुसरे भारतीय ठरले आहेत.

या मिशननंतर भारतातील तरुणांमध्ये अंतराळाविषयी अधिक उत्सुकता निर्माण झाली आहे.

विज्ञान, तंत्रज्ञान,अभियांत्रिकी आणि गणित (स्टीम) या क्षेत्राकडे त्यांचा कल जास्त वाढणार आहे.

ज्यांना अंतराळवीर बनायचे आहे, अंतराळ प्रवास करायचा आहे त्यांच्यासाठी गोपी थोटाकुरा प्रेरणा बनले आहेत.

Kishmish Water | esakal
हे ही वाचा.. रोज बेदाण्याचे पाणी पिण्याचे अनेक फायदे