Haris Rauf Wife : युएसएमधील राड्यानंतर चर्चेत आलेली हारिस रौऊफची पत्नी आहे तरी कोण?

अनिरुद्ध संकपाळ

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौऊफ हा युएसएमध्ये चाहत्यांसोबत झालेल्या वादामुळं चर्चेत आला आहे.

हारिस सोबत त्याला चाहत्याच्या अंगावर धावून जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करणारी त्याची पत्नी देखील चर्चेत आली आहे.

हारिस आणि त्याच्या पत्नीची लव्ह स्टोरी खूप रंजक आहे. हारिस हा कष्टातून इथंपर्यंत पोहचला आहे. तो यापूर्वी मोबाईल शॉपीमध्ये काम करत होता.

हारिस रौऊफच्या पत्नीचं नाव मुजना मसूद मलिक आहे. या दोघांनी 2022 मध्ये लग्न केलं. मुजना लग्नापूर्वी मॉडेलिंग करत होती.

हारिस रौऊफ आणि मुजना या दोघांची लव्ह स्टोरी फार जुनी आहे. हे दोघेही एकाच वर्गात शिकत होते. ते खूप काळ रिलेशनशिपमध्ये होते.

हारिसने पाकिस्तानकडून खेळण्यापूर्वी खूप स्ट्रगल केला आहे. तो आपली फी भरण्यासाठी रविवारी मार्केटमध्ये स्नॅक्स विकत होता.

त्यानं व्यावसायिक क्रिकेट खेळण्यापूर्वी मोबाईल शॉबीमध्ये देखील काम केलं आहे. वयाच्या 23 व्या वर्षापर्यंत तो टेप बॉलने खेळत होता.

हारिस रौऊफची पत्नी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह नाही. तिचे अनेक फेक अकाऊंट आहेत. मात्र राऊफने सोशल मीडिया पोस्ट करत आपल्या पत्नीचे सोशल मीडिया अकाऊंटच नसल्याचे सांगितले.