आशुतोष मसगौंडे
सध्या सुरू असलेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सेमीफायनल गाठणारा लक्ष्य सेन पहिला भारतीय पुरूष खेळाडू ठरला आहे.
लक्ष्यला सेमीफायनलमध्ये डेनमार्कच्या व्हिक्टर एलेक्सनकडून पराभव स्वीकारावा लागला असला तरी त्याने आपल्या दमदार खेळाने व्हिक्टरला जेरीस आणले होते.
लक्ष्य सेन हा बॅडमिंटन जगतातील एक उगवता स्टार आहे. 16 ऑगस्ट 2001 रोजी अल्मोरा, येथे जन्मलेल्या, लक्ष्यने आपल्या अविश्वसनीय कौशल्याने आणि दृढनिश्चयाने स्वतःचे नाव कमावले आहे.
लक्ष्यने आशियाई ज्युनियर चॅम्पियनशिप आणि युवा ऑलिम्पिक खेळांसह अनेक प्रतिष्ठित स्पर्धा जिंकून आंतरराष्ट्रीय ओळख मिळवली.
लक्ष्यची चपळता, पॉवरफुल स्मॅश आणि गेमप्लेने त्याला त्याच्या विरोधकांपेक्षा सरस ठरवतो.
लक्ष्य सेनने आपल्या कामगिरीने जागतिक स्तरावर क्रीडा रसिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. एका छोट्या शहरापासून आंतरराष्ट्रीय कीर्तीपर्यंतचा त्याचा प्रवास आकर्षक आहे.
लक्ष्य सेन हा बॅडमिंटनचा समृद्ध वारसा असलेल्या कुटुंबातून येतो. त्यांचे वडील डी.के. सेन हे एक प्रसिद्ध बॅडमिंटन प्रशिक्षक आहेत. त्याचा भाऊही प्रोफेशनल बॅडमिंटन खेळाडू आहे.
प्रशिक्षणचा लक्ष्यच्या यशात सिंहाचा वाटा आहे. लक्ष्यने बंगळुरू येथील प्रकाश पदुकोण बॅडमिंटन अकादमीमध्ये प्रशिक्षण घेतले आहे, जे भारतातील प्रमुख बॅडमिंटन प्रशिक्षण केंद्रांपैकी एक आहे.
लक्ष्य सेनचे बॅडमिंटनमधील भविष्य आशादायक आणि उज्वल दिसते. पॅरिस ऑलिम्पिकच्या सेमीफायनलमध्ये ज्या व्हिक्टर एलेक्सनकडून तो पराभूत झाला त्यानेही लक्ष्यचे कौतुक केले आहे.