Saisimran Ghashi
लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांची भारतीय सैन्य दलाचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ते 30 जून रोजी निवृत्त होणारे जनरल मनोज पांडे यांच्यानंतर पदभार स्वीकारणार आहेत.
सीमावर्ती भागातील मोठ्या अनुभवासोबत ते सध्या सैन्य उपप्रमुख म्हणून काम करत आहेत.
1 जुलै 1964 ला यांचा जन्म झाला असून 1984 रोजी भारतीय सैन्याच्या 18 जम्मू आणि काश्मीर रायफल्समध्ये कमिशन झाले.
लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांना परम विशिष्ट सेवा मेडल, अति विशिष्ट सेवा मेडल आणि तीन जीओसी-इन-सी कंमडेशन कार्ड्सने सन्मानित करण्यात आले आहे.
उत्तरेच्या सैन्यदल कमांडर म्हणून, लेफ्टनंट जनरल द्विवेदी यांनी उत्तरेकडील आणि पश्चिम सीमेवर सातत्याने चालू असलेल्या कारवायांच्या नियोजनासाठी आणि अंमलबजावणीसाठी रणनीतिक मार्गदर्शन आणि कारवाईवर देखरेख केली.
जम्मू आणि काश्मीरमध्ये अनेक अतिगंभीर दहशतवादाविरोधी मोहिमांचे नियोजन देखील त्यांनी केले.
या काळात, लेफ्टनंट जनरल द्विवेदी हे चीन सीमावाद मिटवण्यासाठी सुरू असलेल्या वाटाघाटींमध्ये सक्रिय सहभागी होते.
जवळपास 40 वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी विविध कमांड, स्टाफ, प्रशिक्षण आणि परदेशातील नियुक्तींवर काम केले आहे.