आशुतोष मसगौंडे
इराणच्या अध्यक्ष पदासाठी कट्टरपंथी सईद जलिली आणि सुधारणावादी मसूद पेजेश्कियान यांच्यात लढत होती. ज्यामध्ये मसूद पेजेश्कियान विजयी झाले आहेत.
या निवडणुकीत पेझेश्कियान यांनी अनेक दशकांपासून अमेरिकेच्या नेतृत्वाशी संघर्ष करणाऱ्या इराणला पाश्चिमात्य देशांशी जोडण्याचे आश्वासन दिले आहे.
या निवडणुकीत सुधारणावादी नेते पेझेश्कियान यांना १.६३ कोटी मते मिळाली. तर कट्टरवादी उमेदवार सईद जलिली यांना १.३५ कोटी मते मिळाली.
पेजेश्कियान हे देशाचे माजी आरोग्य मंत्रीही राहिले आहेत. सुधारणांवर विश्वास ठेवणारा नेता अशी त्यांची प्रतिमा आहे. पाश्चात्य देशांशी संबंध सुधारण्यावर विश्वास ठेवणारे ते नेते आहेत.
इराणचे नवे अध्यक्ष मसूद पेजेश्कियान हे व्यवसायाने डॉक्टर आहेत आणि ते इराणच्या तबरीझ वैद्यकीय विद्यापीठाचे प्रमुख आहेत. पेजेश्कियान यांनी 1997 मध्ये इराणचे आरोग्य मंत्री म्हणून काम केले आहे.
मसूद पेझेश्कियान यांनी 2011 सालीही राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आपली उमेदवारी जाहीर केली होती, परंतु नंतर त्यांनी उमेदवारी मागे घेतली.
पेजेश्कियान हे संयमी नेते असून माजी राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांच्या जवळचे मानले जातात. पेझेश्कियान हे कठोर हिजाब कायद्यांचे विरोधक मानले जातात.
पेजेश्कियान हे संयमी नेते असून माजी राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांच्या जवळचे मानले जातात. पेझेश्कियान हे कठोर हिजाब कायद्यांचे विरोधक मानले जातात.