प्रायव्हेट व्हिडिओ लीक करणारी पाकिस्तानी टिकटॉक स्टार कोण?

सकाळ ऑनलाईन

लोकप्रिय पाकिस्तानी टिकटॉक स्टार मिनाहिल मलिक हिचा एक कथित प्रायव्हेट व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

मिनाहिल मलिकचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ माजली होती. यामुळं सध्या ती ट्रेंडिंगमध्ये आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये मिनाहिल मलिक आपल्या बॉयफ्रेन्डसोबत दिसत आहे. पण हा व्हिडिओ मॉर्फ असल्याचं तिनं म्हटलं आहे.

या वादात पाकिस्तानी अभिनेत्री मिशी खान हीनं उडी घेतली असून मिनाहिल हिनं हा प्रकार प्रसिद्धी मिळवण्यासाठी केल्याचा दावा तिनं केला आहे.

Pakistan Minahil Malik

मिशी खाननं म्हटलं की, मलिक हीनं बॉलिवूड हिरॉईनपासून प्रेरणा घेत, स्वतःचाच व्हिडिओ लीक केला आहे.

Pakistan Minahil Malik

मिशी खान हीनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडिओ पोस्ट करुन मिनाहिल मलिक हीच्यावर आरोप करत तिनं प्रसिद्धीसाठी अनेकदा असे प्रकार केलेत.

Pakistan Minahil Malik

मिशी खान हीनं मलिक हीच्यावर अनेक खळबळजनक आरोप केले आहेत.

Pakistan Minahil Malik

लोकांनी सोशल मीडियाचा वापर अशा प्रकारे करु नये, त्यापासून सावध रहावं असं आवाहन मिशी खान हीनं केलं आहे.

Pakistan Minahil Malik

दुसऱ्या कोणा व्यक्तीचा डीपफेक व्हिडिओ बनवण्यासाठी कोणी उगाचच पैसे खर्च करेल का? असा सवालही मिशी खाननं केला आहे.

Pakistan Minahil Malik

अशा प्रकारचे व्हिडिओ बनवणं हे समाजावर आणि कुटुंबियांवरही गंभीर परिणाम करणारं आहे, असंही पाकिस्तानी अभिनेत्री मिशी खान हीनं म्हटलं आहे.

Pakistan Minahil Malik