आशुतोष मसगौंडे
शोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्य यांचा आज हैदराबादमध्ये साखरपुडा झाला. नागा चैतन्यचे वडील, तेलुगु सुपरस्टार नागार्जुन यांनी अधिकृतपणे X वर एका पोस्टमध्ये याची घोषणा केली.
शोभिता धुलिपाला ही एक भारतीय सुपरमॉडेल असून, तिने मिस अर्थ इंडिया 2013 चा खिताब जिंकला होता.
शोभिता धुलिपालाचा जन्म 31 मे 1992 रोजी तेनाली, आंध्र प्रदेश येथे झाला. ती तीन वर्षांची असताना ती तिच्या कुटुंबासह विशाखापट्टणमला स्थलांतरीत झाली आणि तिथेच तिचे बालपण गेले.
शोभिता तिचे उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, ती तिच्या कुटुंबासह मुंबईला आली. मुंबईतील एचआर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून तिने वाणिज्य पदवी प्राप्त केली आहे.
शोभिता धुलिपाला भरतनाट्यम आणि कुचीपुडीमध्ये प्रशिक्षित शास्त्रीय नृत्यांगना आहे.
शोभिताने अनुराग कश्यपच्या रमन-राघव 2.0 मधून अभिनयात पदार्पण केले. हा चित्रपट कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता.
शोभिता धुलीपालाच्या नेट वर्थबद्दल बोलायचे तर, तिची एकूण मालमत्ता 7 ते 10 कोटी रुपये आहे.
शोभिता धुलिपाला चित्रपट, मालिका आणि जाहिरातींमधून चांगली कमाई करते. काही रिपोर्ट्सनुसार शोभिता जाहिराती, चित्रपट आणि मालिकांसाठी 70 लाख ते 1 कोटी रुपये घेतात.