Saisimran Ghashi
स्क्वॉड्रन लीडर मोहना सिंग यांनी भारतीय हवाई दलाच्या एलिट 18 'फ्लाइंग बुलेट्स' स्क्वाड्रनमध्ये सामील होणारी स्वदेशी LCA तेजस लढाऊ विमान चालवणारी पहिली महिला लढाऊ पायलट बनून इतिहास रचला आहे.
तर जाणून घेऊया कोण आहेत मोहना सिंग आणि त्या कश्या बनल्या देशातल्या लाखो मुलींसाठी प्रेरणा..
मोहना सिंग झुंझुनू, राजस्थान येथील असून तिला लहानपणापासून सैन्य परंपरेचा वारसा आहे. तिचे वडील हवाई दलात वॉरंट ऑफिसर होते.
2016 साली मोहना सिंग भारतीय हवाई दलात फायटर पायलट म्हणून नियुक्त झाली.
हॉक विमानावर 500 तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव असलेली मोहना ही पहिली महिला पायलट आहे.
मोहना सिंग एलसीए तेजस सारख्या अत्याधुनिक लढाऊ विमानांचे प्रशिक्षण घेत आहे.
एलसीए तेजस हे भारतीय बनावटीचे बहुउद्देशीय लढाऊ विमान आहे ज्याचे डिझाईन हलके आणि अॅव्हिओनिक्स प्रगत आहेत.
मोहना सिंगचे फायटर पायलट म्हणून नियुक्ती होणे हे हवाई दलाच्या महिला समावेशनाच्या दिशेने मोठे पाऊल आहे.
ती महिलांसाठी प्रेरणास्थान ठरली असून ही भूमिका महिलाही बजावू शकतात हे दाखवून दिले.
मोहना सिंगने लष्करातील महिलांसाठी नवे मार्ग खुले करत ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे.