आशुतोष मसगौंडे
स्टारबक्सने अलीकडेच नेतृत्व बदलाची घोषणा केली आहे. आता ब्रायन निकोल अध्यक्ष आणि सीईओ म्हणून लक्ष्मण नरसिंहन यांची जागा घेणार आहेत.
दरम्यान लक्ष्मण नरसिंहन यांची हकलपट्टी केल्यानंतर त्यांनी एका महिन्यापूर्वी दिलेल्या मुलाखतीतील एक विधान व्हायरल होत आहे.
या मुलाखतीमध्ये लक्ष्मण नरसिंहन म्हणाले होते की, वर्क-लाईफ बॅलेन्स साधण्यासाठी मी कधीच संध्याकाळी सहानंतर काम करत नाही.
व्हायरल व्हिडिओमध्ये, नरसिंहन म्हणत आहेत की, "स्टारबक्समधील कोणालाही संध्याकाळी 6 वाजल्यानंतर माझ्या वेळेचा एक मिनिट जरी मिळाला तर समजून घ्या की ते माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत."
मुलाखतीदरम्यान, नरसिंहन यांनी वर्क-लाईफ बॅलेन्सचे महत्त्व सांगत होते. त्यांनी वैयक्तिक वेळेच्या महत्त्वावर जोर दिला आणि म्हटले की, जर एखादे अती महत्त्वाचे काम असल्याशिवाय मी सहानंतर एक मिनिटही काम करत नाही.
स्टारबक्सच्या माजी CEO चे नाव देखील Google वर ट्रेंड होत आहे.
अनेक लोक त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी शोधत आहेत. त्यांचा पगार जाणून घेण्यातही अनेकांना रस आहे.
सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे की, माजी सीईओंनी दिलेल्या मुलाखतीमुळे त्यांना नोकरी गमवावी लागली आहे.