Anuradha Vipat
हिंदी ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
आता ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात सहभागी होण्यासाठी सर्वाधिक मानधन घेणाऱ्या स्पर्धकाच्या नावाची चर्चा सुरू आहे.
यंदाच्या पर्वातील महागडी स्पर्धक ही दुसरी-तिसरी कोणी नसून निया शर्माचं आहे.
माहितीनुसार, निया शर्माने ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात सहभागी होण्यासाठी ५ ते ५.५ कोटी रुपयांची मागणी केली आहे.
त्यामुळे निया ही यंदाच्या पर्वातील सर्वाधिक मानधन घेणारी स्पर्धक आहे.
माहितीनुसार, नियाला प्रत्येक भागासाठी ५.४ लाख रुपये दिले जाणार आहेत.
यंदाच्या ‘बिग बॉस’च्या पर्वात बरंच वेगळं काहीतरी पाहायला मिळणार आहे.