Anuradha Vipat
संजय दत्तच्या पहिल्या दोन पत्नींबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.
संजूबाबाच्या पहिल्या पत्नीचं नाव रिचा शर्मा असं होतं.
रिचा शर्मा हिचे मुलीच्या जन्मानंतर कर्करोगाने निधन झालं.
त्यानंतर संजय दत्तच्या आयुष्यात दुसरी पत्नी रिया पिल्लाई हिची एन्ट्री झाली.
संजय दत्त तुरुंगात असताना रियाने संजूबाबाची साथ सोडली नाही.
त्यामुळे तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजय दत्त आणि रिया पिल्लाई यांनी लग्न केलं.
रिया पिल्लाई आणि संजय दत्त यांनी 14 फेब्रुवारी 1998 मध्ये लग्न केलं पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही.