Amit Ujagare (अमित उजागरे)
डोनाल्ड ट्रम्प हे दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत.
सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांनी अनेक हिंदू-अमेरिकनं सहकाऱ्यांना आपल्या मंत्रिमंडळात सामावून घेतलं आहे.
नुकतेच त्यांनी तुलसी गब्बार्ड यांची राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखपदी नियुक्ती केली.
तुलसी गब्बार्ड या भारतीय वंशाच्या हिंदू-अमेरिकन आहेत, त्या पूर्वी सैन्यात उच्चपदावर कार्यरत होत्या.
अनेकदा त्या मध्य पूर्व देशांमध्ये आणि अफ्रिकेतील युद्ध क्षेत्रांमध्ये तैनात होत्या.
सैन्य दलातील अनुभवामुळं त्यांना राष्ट्रीय सुरक्षेविषयी सखोल ज्ञान आणि दृष्टीकोन आहे.
तुलसी गब्बार्ड या माजी काँग्रेस सदस्या असून अमेरिकेची पहिली हिंदू काँग्रेस वूमन म्हणून त्यांची ओळख आहे.
तुलसी गब्बार्ड या पूर्वी डेमोक्रेटिक पार्टीमध्ये होत्या, नंतर २०२२ मध्ये त्यांनी रिपब्लिकन पार्टीत प्रवेश केला.
२०१९ च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांनी प्राथमिक डिबेटमध्ये कमला हॅरिस यांचा पराभव केला होता. मात्र, राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत त्या मागे पडल्या.
गब्बार्ड यांची आई भारतीय असून त्यांना भारतीय संस्कृतीचं कायमच अप्रुप असल्यानं मुलीचं नावही त्यांनी तुलसी ठेवलं होतं.