Bigg Boss OTT 3 स्पर्धक विशाल पांडेला अरमान मलिकनं का मारली थप्पड? का आला त्याला इतका राग?

सकाळ डिजिटल टीम

Vishal Pandey Net Worth : बिग बॉस ओटीटी 3 स्पर्धक विशाल पांडे सध्या चर्चेत आहे. अलीकडेच, विशालनं अरमान मलिकच्या दुसऱ्या पत्नीबद्दल एक टिप्पणी केलीये, ज्यामुळं वाद सुरु झालाय.

Bigg Boss OTT 3 Vishal Pandey

विशाल पांडेनं त्याचा मित्र लवकेश कटारियाला पलक तिवारीबद्दल सांगितलं, 'मला वहिनी आवडते.' याची माहिती अरमान मलिकला समजताच त्यानं रागाच्या भरात विशालला थप्पड मारली. त्यानंतर अरमानला शोमधून बाहेर काढण्याची मागणी होत आहे.

Bigg Boss OTT 3 Vishal Pandey

विशाल पांडे आणि अरमान मलिक यांच्यातील या जोरदार वादावर सोशल मीडियावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. त्याच वेळी, काही लोकांना हे जाणून घ्यायचंय की, विशाल पांडे कोण आहे?

Bigg Boss OTT 3 Vishal Pandey

अभिनेता असण्यासोबतच विशाल पांडे सोशल मीडियावर प्रभाव टाकणारा देखील आहे. इंस्टाग्रामवर त्याचे 9 मिलियन फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर तो अनेकदा त्याच्या व्हिडिओंमुळे चर्चेत असतो. TikTok वरून विशाल पांडेला वेगळी ओळख मिळालीये.

Bigg Boss OTT 3 Vishal Pandey

अभिनेता म्हणून विशालनं अनुराग कश्यप, आमिर खान आणि अनेक मोठ्या सेलिब्रिटींसोबत काम केलं आहे. बॉलिवूड स्टार्सही त्याला सोशल मीडियावर फॉलो करतात.

Bigg Boss OTT 3 Vishal Pandey

रिपोर्ट्सनुसार, विशाल पांडेची एकूण संपत्ती 5 ते 10 कोटी रुपये आहे. त्याचे वार्षिक उत्पन्न 1.5 कोटी ते 3 कोटी रुपये आहे. यानुसार विशाल दर महिन्याला 10 ते 20 लाख रुपये कमावतो.

Bigg Boss OTT 3 Vishal Pandey

वयाच्या 40 व्या वर्षीही 'या' अभिनेत्रीचा जलवा; 'स्विमिंग पूल'जवळील मिनी स्कर्टमधील फोटो व्हायरल

Actress Aamna Aharif
येथे क्लिक करा