दारु-सॉफ्ट ड्रिंकमुळे दरवर्षी एक कोटी लोकांचा बळी; WHO ची माहिती

Sudesh

रिपोर्ट

दारु किंवा साखर असणाऱ्या सॉफ्ट ड्रिंकच्या सेवनामुळे दरवर्षी जगभरात 1 कोटींहून अधिक लोकांचा बळी जातो, असं WHO ने म्हटलं आहे.

WHO on Liquor Tax | eSakal

कर

यामुळेच अशा पेयांवरील कर वाढवण्याची मागणी जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे. याबाबत त्यांनी देशांना आवाहन केलं आहे.

WHO on Liquor Tax | eSakal

मागणी

जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे, की साखर असलेल्या सर्व पेय पदार्थांवर आणि मादक पेय पदार्थांवर उत्पादन शुल्क लागू करण्यात यावं.

WHO on Liquor Tax | eSakal

दारुबळी

दारु प्यायल्यामुळे जगभरात दरवर्षी 26 लाखांहून अधिक लोकांचा बळी जातो, असं WHO च्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

WHO on Liquor Tax | eSakal

सॉफ्ट ड्रिंक

अनहेल्दी फूड आणि शर्करायुक्त सॉफ्ट ड्रिंक यामुळे सुमारे 80 लाखांहून अधिक लोकांचा बळी जात असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे.

WHO on Liquor Tax | eSakal

पाण्यावरील कर

WHO ने म्हटलं आहे, की कित्येक देशांमध्ये पाण्यावर कर लागू आहे, मात्र सॉफ्ट ड्रिंकवरील कर केवळ 6.6 टक्के आहे.

WHO on Liquor Tax | eSakal

WHO ची मागणी

यामुळेच, पाण्यावरील कर हटवून त्या ऐवजी शर्करायुक्त सॉफ्ट ड्रिंकवरील कर वाढवण्याचे आवाहन WHO ने देशांना केलं आहे.

WHO on Liquor Tax | eSakal

सर्वांचाच फायदा

यामुळे कंपन्या अधिक हेल्दी उत्पादनं बनवतील, नागरिकांचं आरोग्य सुरक्षित राहील आणि सरकारलाही पैसे मिळतील असं WHO ने म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WHO on Liquor Tax | eSakal