कार्तिक पुजारी
शंकराचार्यांचा जन्म ७८८ सालामध्ये झाल्याचं सांगितलं जातं. वयाच्या ३२ व्या वर्षी म्हणजे ८२० मध्ये त्यांचे निधन झाले.
सनातन धर्मामध्ये शंकराचार्यांच्या पदाला खूप महत्त्व आहे. शंकराचार्य पदाची स्थापना आद्य शंकराचार्यांनी केली होती.
यात,उत्तरेतील बद्रिकाश्रम ज्योतिर्मठ, दक्षिणतील श्रृंगरे मठ, पू्र्वेकडील जगन्नाथपुरी आणि पश्चिमीकडील द्वारकेचे शारदा मठ यांचा समावेश होतो.
बौद्ध धर्मामध्ये जसे दलाई लामा असतात किंवा ख्रिश्नन धर्मामध्ये पोप यांना मान असतो, तसेच स्थान शंकराचार्यांना असते.
हिंदू धर्माचा प्रचार-प्रसार आणि विकासामध्ये आदि शंकराचार्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.
त्यांनी भारताच्या चारही दिशांना चार मठांची स्थापना केली.
अद्वैत वेदांतचे प्रणेते, संस्कृत विद्वान, उपनिषद व्याख्याता आणि सनातन धर्म सुधारक अशी त्यांची ओळख आहे