अनाजीपंत कोण होता ? Historical Facts

Sandip Kapde

अनाजीपंत नेमका कोण

महाराष्ट्राच्या इतिहासातील एक खलनायक म्हणून अनाजीपंत हे नाव घेतले जाते. मात्र अनाजीपंत नेमका कोण होता हेच अनेकांना ठाऊक नसते.

Who was Annaji Pant | esakal

सचिव

अनाजी पंत उर्फ अण्णाजी दत्तो हा छ. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सचिव (सुरनीस) आणि स्वराज्यातील जमीन महसूल व्यवस्थेतील एक प्रमुख कारभारी होता.

Who was Annaji Pant | esakal

दादोजी कोंडदेव

दादोजी कोंडदेव वारल्यानंतर महाराजांनी अण्णाजीची नेमणूक जमीन महसूल खात्यात केली.

Who was Annaji Pant | esakal

संगमेश्वर

अण्णाजी हा संगमेश्वरचा परंपरागत देशकुलकर्णी असल्यामुळे त्याला कोकणातील मामले प्रभावळी येथील उत्पन्नाचे हिशोब ठेवण्याच्या कामाचा चांगलाच अनुभव होता.

Who was Annaji Pant | esakal

बुद्धिमान पंडित

अण्णाजी दत्तो महत्त्वाकांक्षी आणि बुद्धिमान पंडित होता. त्याने जमीन मोजणीची नवीन योजना अमलात आणली

Who was Annaji Pant | esakal

नैसर्गिक आपत्ती

अण्णाजीच्या नवीन सारावसुली पद्धतीमुळे स्वराज्यातील जमिनींचे अचूक मोजमाप झाले. नैसर्गिक आपत्तीमधून शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेतली.

Who was Annaji Pant | esakal

अंदाधुंदी

मुसलमानी राजवटींच्या त्या काळी अंदाधुंदी माजली होती. शेतकऱ्यांना जुलमी अशा सुमारे पन्नास पट्ट्या व कर भरावे लागत असत.

Who was Annaji Pant | esakal

उत्पन्न

या करांपैकी अनेक कर छ. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात रद्द करण्यात येऊन एकूण उत्पन्नापैकी चाळीस टक्के कर लावण्यात आला होता.

Who was Annaji Pant | esakal

महसूल

हंगामातल्या बाजारभावाप्रमाणे धाऱ्याच्या भागाचे रूपांतर केले. त्यामुळे जमिनीचा महसूल अचूक व वेळेवर मिळत गेल्यामुळे रयतेची, पर्यायाने स्वराज्याचीही स्थिती सुधारली.  

Who was Annaji Pant | esakal

मृत्यू

३ एप्रिल १६८० रोजी शिवाजी महाराजांचा अल्पशा आजाराने मृत्यू झाला.

Who was Annaji Pant | esakal

सिंहासन

सिंहासनावर बसणार याची चर्चा सुरू झाली. त्यावेळी स्वराज्याचे युवराज संभाजी महाराज रायगडावर नव्हते.

Who was Annaji Pant | esakal

विरोध

अष्टप्रधान मंडळातील मोरोपंत पिंगळे, अण्णाजी दत्तो, निराजी हे तीन मंत्री संभाजी महाराजांच्या विरोधात होते.

Who was Annaji Pant | esakal

निधन

शिवरायांच्या निधनाची बातमी देखील युवराजांपासून लपवण्यात आली.

Who was Annaji Pant | esakal

राजाराम महाराज

स्वराज्याच्या गादीवर अल्पवयीन राजाराम महाराजांना बसवण्यात आले व राज्यकारभार सोयराबाई राणीसाहेबांनी हाती घेतला.

Who was Annaji Pant | esakal

संमती

यासाठी इतर मंत्रिमंडळाची संमती अण्णाजी दत्तो याने घेतली.  

Who was Annaji Pant | esakal

कटकारस्थान

अण्णाजी दत्तो याचा संभाजी महाराजांवर रोष होता त्यामुळेच त्याने हे कटकारस्थान रचले होते.

Who was Annaji Pant | esakal

पन्हाळा

मात्र शिवाजी महाराजांच्या मृत्यूची माहिती पन्हाळ्यावर संभाजी महाराजांपर्यंत पोहचली.

Who was Annaji Pant | esakal

हंबीरराव मोहिते

सैन्याचा व रयतेचा ओढा संभाजी महाराजांकडे होता. स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी देखील त्यांनाच पाठिंबा दिला.

Who was Annaji Pant | esakal

रायगड

या पाठिंब्याच्या जोरावर संभाजी महाराजांनी रायगड आपल्या ताब्यात घेतला.

Who was Annaji Pant | esakal

सोयराबाईं

अण्णाजी दत्तो व इतर मंत्र्यांना अटक करण्यात आली. सोयराबाईंना नजरकैदेत टाकण्यात आले.

Who was Annaji Pant | esakal

राज्याभिषेक

पुढे १४ जानेवारी १६८१ रोजी संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. स्वराज्यात आनंदीआनंद झाला.

Who was Annaji Pant | esakal

फितुरी

त्यावेळी फितुरी करणाऱ्यांना संभाजी महाराजांनी माफ केले. अनेकांना पूर्वीच्या जागी नेमणुका केल्या.

Who was Annaji Pant | esakal

सचिव

अण्णाजी दत्तो यास देखील बंधन मुक्त करण्यात आले. त्याला मात्र सचिव पदाऐवजी अमात्य किंवा मुजुमदार म्हणून नेमण्यात आले.

Who was Annaji Pant | esakal

अण्णाजी दत्तो

संभाजी महाराजांनी मोठे मन दाखवले तरी अण्णाजी दत्तो याने आपली कारस्थानी वृत्ती सोडली नाही व त्याने संभाजी राजांवर विषप्रयोग करवला.

Who was Annaji Pant | esakal

अण्णाजी दत्तो

मात्र तो प्रयत्न फसला. अण्णाजी दत्तो यतस बेड्या ठोकण्यात आल्या.

Who was Annaji Pant | esakal

छत्रपती

छत्रपतींना पदच्युत करण्यासाठी मुघलांची मदत घेण्यासाठी प्रयत्न झाले.

Who was Annaji Pant | esakal

शहजादा अकबर

शहजादा अकबर याचे संभाजी महाराजांशी मैत्रीचे नाते असल्यामुळे त्याने पुराव्याचे पत्र त्यांना पाठवून दिले.

Who was Annaji Pant | esakal

संभाजी महाराज

हे दोन्ही कट करणाऱ्यांना संभाजी महाराजांनी शिक्षा केली. २० जणांना मृत्यू दंड देण्यात आला.

Who was Annaji Pant | esakal

अनाजीपंत

अण्णाजी दत्तो उर्फ अनाजीपंत यास हत्तीच्या पायी देऊन ठार करण्यात आले.  

Who was Annaji Pant | esakal

संदर्भ:  

शिवकाल: डॉ. वि. गो. खोबरेकर आणि मराठी विश्वकोश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who was Annaji Pant | esakal