कोण होते भगवान बाबा? ज्यांच्या गडावर होतो मुंडे परिवाराचा दसरा मेळावा

आशुतोष मसगौंडे

'भगवान बाबा'

आबाजी तुबाजी सानप हे 'भगवान बाबा' म्हणून प्रसिद्ध होते, त्यांचा जन्म सावरगाव घाट तालुका, पाटोदा जिल्हा, बीड येथे झाला.

Bhagwan Baba | Esakal

जन्म

29 जुलै 1896 रोजी जन्मलेले भगवान बाबा महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे प्रसिद्ध संत होते.

Bhagwan Baba | Esakal

गुरू

भगवान बाबा हे गीतेबाबा दिघुळकर, माणिकबाबा, बंकटस्वामी महाराज, संत नामदेव महाराज आणि संत एकनाथ महाराज यांना आपले गुरू मानत होते.

Bhagwan Baba | Esakal

नारायणगड ते पंढरपूर असी पायी वारी

भगवान बाबा यांनी 1918 मध्ये नारायणगड ते पंढरपूर असी पायी वारी चालू केली होती. त्यामुळे तेव्हापासून नारायणगडाला ‘धाकटी पंढरी’ म्हटले जाते.

Bhagwan Baba | Esakal

जातपात, धर्मभेद दूर करण्यासाठी काम

भगवान बाबा यांनी समाजातील जातपात, धर्मभेद, उच्चनीचता, व पंथभेद दूर करण्यासाठी मोठे काम केले आहे.

Bhagwan Baba | Esakal

भगवान बाबांच्या हत्येचा प्रयत्न

त्या काळात भगवानबाबांची कीर्ती सर्वत्र पसरली होती. त्यामुळे काही वाईट प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांना खूप त्रास दिला. त्यांना मारण्यासाठी मारेकरी पाठवून हत्येचा प्रयत्न झाला होता.

Bhagwan Baba | Esakal

दसरा मेळावा

दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून भगवान गडावर गोपीनाथ मुंडे आणि त्यांच्यानंतर आता पंकजा मुंडे दसरा मेळावा आयोजित करतात. यासाठी लाखो लोक उपस्थित असतात.

Bhagwan Baba | Esakal

पंकजा-धनंजय

भगवान गडावर आज पंकजा मुंडे यांनी दसरा मेळावा आयोजित केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत धनंजय मुंडेही उपस्थित राहणार आहेत.

Bhagwan Baba | Esakal

IT क्षेत्रात मंदी आल्यास पुण्यावर काय परिणाम होणार?

The IT sector in Pune faces challenges amidst economic recession. | Esakal
आणखी पाहा...