Vaibhav Mane
शालेय शिक्षणानंतर उच्च शिक्षणासाठी पुण्यातील बीएमसीसी महाविद्यालयात येथे 1959 ला प्रवेश घेतला.आयएलएस विधी महाविद्यालयातून त्यांनी गोल्ड मिडल मिळवत एलएलबी केले.
वयाच्या 25 व्या वर्षी त्यांनी घर सोडत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करण्यास सुरुवात केली संपूर्ण आयुष्य त्यांनी देश सेवेसाठी घालवले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा देशात प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांनी संपूर्ण देश पिंजून काढला होता.
1969 पासून संघ प्रचारक,विविध उत्तरदायित्वा- नंतर योजनेतून साधारणतः 1975 पासून अभाविप आयामात जबाबदारी अभाविपत विभाग, प्रदेश,क्षेत्रीय या जबाबदारी स्वीकारली.अ.भा. संघटन मंत्री म्हणून ही त्यांनी काम केले.
१९६४ पासून त्यांनी मुंबईत अभाविपचे कार्य सुरू केले. १९६६ मध्ये अभाविप मुंबईचे मंत्री झाले.१९६६ मध्ये आंतरराज्यीय विद्यार्थी जीवन दर्शनचे प्रतिनिधी ईशान्येकडे गेले आणि त्यांनी ईशान्येशी संपर्क सुरू केला.१९६७ मध्ये अभाविपच्या इंदूर अधिवेशनापासून त्यांनी अभाविपचे पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून कामाला सुरवात केली. १९७० च्या तिरुवनंतपुरम अधिवेशनात राष्ट्रीय संघटन मंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली.
पूर्ण देशभरात तालुका- महाविद्यालय- शहर स्तरावर संस्कारित कार्यकर्ता समूह उभा राहील यासाठी विशेष लक्ष देत संघटन उभे केले .
भाविपला नावाप्रमाणे अखिल भारतीय स्तरावर नेण्यात पायाला भिंगरी लावल्यासारख सतत प्रवास करीत देशभरात अनेक समर्पित कार्यकर्त्यांची फळी उभी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.