Amit Ujagare (अमित उजागरे)
इंदिरा गांधी पंतप्रधान असताना २५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती.
आणीबाणी लागू झाल्यानंतर सरकारविरोधात कुठल्याही हालाचालींवर बंदी आली होती.
विरोधकचं नव्हे तर पत्रकारांवरही कडक निर्बंध लादण्यात आले होते.
यामुळं खरंतर देशात सर्वत्र अफरातफरी माजली होती, ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवला जायचा.
पण इंदिरा गांधींना आणीबाणी लागू करण्याचा सल्ला देणारा सुत्रधार कोण होता? माहितीए का?
सिद्धार्थ शंकर रे असं या सुत्रधाराचं नाव आहे. हे इंदिरा गांधींचे अत्यंत विश्वासून आणि लहानपणीचे मित्र होते.
इंदिरा गांधींनी त्यांना कोलकात्यावरुन दिल्लीला बोलावून घेतलं होतं. त्यानंतर २४ जून रोजी त्यांच्याशी चर्चेनंतर रे यांनीच गांधींना देशात आणीबाणी लावण्याचा सल्ला दिला.
त्यामुळं देशात आणीबाणी लागू करण्याची तयारी इंदिरा गांधींनी आधीच केली होती. पण काही लेखकांच्या मते आणीबाणी लागू करण्यामागं इंदिरा गांधींचाच विचार असल्याचं मानतात.