Payal Naik
मुकेश अंबानी यांची अँटिलीया ही इमारत जगातील सगळ्यात महागडं घर असल्याचं सांगितलं जातं. ही इमारत बांधण्यासाठी 2 बिलियन डॉलरचा खर्च आला होता.
आज याची किंमत 4.6 बिलियन डॉलर आहे. या अलिशान घरात २७ मजले, जिम, स्पा, थिएटर, टेरेस गार्डन, स्विमिंग पूल, मंदिर, आरोग्य सुविधा, 168 कारची पार्किंग आणि 10 लिफ्ट्स आहेत.
8 रिक्टर स्केलपर्यंतच्या भूंकपातही इमारत तग धरुन उभी राहू शकते. पण ज्या जमिनीवर अॅटिलिया बनलीय, तिथे आधी काय होतं?
या जमिनीवर करीमभाई इब्राहिम खोजा यतीमखाना (अनाथालय) होते. याचे कामकाज वक्फ बोर्डाची एक चॅरीटी पाहायची.
1895 मध्ये एक श्रीमंत जहाज मालक करीमभाई इब्राहिम यांनी या अनाथालयाची स्थापना केली होती. 2002 मध्ये ट्रस्टने ही जमीन विकण्याची परवानगी मागितली. चॅरिटी कमिशनने 3 महिन्यात ही परवानगी दिली.
चॅरिटीने वंचित खोजा मुलांच्या शिक्षणासाठी असलेली ही जमीन जुलै 2002 मध्ये मुकेश अंबानी यांच्या अॅटिलिया कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेडला 2.5 मिलियन डॉलरमध्ये विकली.
स्पेनच्या एका द्वीपवरुन प्रेरीत होऊन इमारतीचे नाव अॅटिलिया असे ठेवण्यात आले. ही इमारत अमेरिकन आर्किटेक्चर कंपनी पर्किन्स अॅण्ड विलने डिझाइन केली आहे.
नोव्हेंबर 2010 मध्ये अॅण्टिलियामध्ये गृह प्रवेश सोहळा झाला होता. सप्टेंबर 2011 मध्ये अंबानी परिवार अॅटिलियामध्ये राहायला आला.