Payal Naik
दादा कोंडके म्हणजेच कृष्णा कोंडके यांच्या चित्रपटांनी अख्खी सिनेसृष्टी हादरवली. मात्र दादा कोंडके यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कुणालाही फारसं ठाऊक नाही.
दादांचं लग्न झालं होतं हेदेखील अनेकांना ठाऊक नाही. त्यांच्या आत्मचरित्रात मात्र त्यांनी ही गोष्ट सांगितली आहे.
त्यांचा संसार अवघ्या चार वर्षात मोडला होता. कोण होती त्यांची पत्नी?
दादांनी आपल्या 'एकटा जीव' या आत्मचरित्रात उल्लेख केल्याप्रमाणे, जेव्हा दादांना मुंबईत गिरणी कामगारम्हणून नोकरी मिळाली तेव्हा त्यांच्या भावाने त्यांच्यापाठी लग्नाचा तगादा लावला.
दादांसाठी नलिनी नावाच्या मुलीचं स्थळ आलं. नलिनी गरीब घरातील होती त्यामुळे त्यांच्या मुलांकडून फार अपेक्षा नव्हत्या.
१९६४ मध्ये दादांचं लग्न झालं. सुरुवातीला त्यांनी पत्नीला दादा आणि वहिनीसोबत इंगवली येथे ठेवलं.
नंतर त्यांचं 'विच्छा माझी पुरी करा' हे लोकनाट्य तुफान चालू लागलं. त्याचे चांगले पैसे येऊ लागले. त्यानंतर दादांनी परेल येथे स्वतःचं घर घेतलं.
नलीनीलादेखील मुंबईला आणलं. मात्र नाटकाच्या दौऱ्यांमुळे त्यांचं संसाराकडे दुर्लक्ष झालं. मध्यंतरी त्यांच्या मध्ये काहीतरी बिनसलं ज्याचा आत्मचरित्रात उल्लेख करणं दादांनी टाळलं
मात्र पुढे त्यांचं नातं पूर्वीसारखं कधीही झालं नाही. शेवटी १९६८मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. मात्र या घटस्फोटासाठी दादांना नलिनीला त्याकाळी तब्बल ४० हजारांची पोटगी द्यावी लागली होती.