Anuradha Vipat
'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद'चं तिसरं पर्व येत्या 13 जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
शनिवार आणि रविवार रात्री 9 वाजता हा कार्यक्रम स्टार प्रवाह वाहिनीवर पहायला मिळणार आहे
सुप्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ चांदेकर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले छोटे उस्ताद आपल्या सुरांनी संपूर्ण महाराष्ट्राला आता वेड लावणार आहेत.
पहिल्या पर्वातही सिद्धार्थने सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली होती
तिसऱ्या पर्वात पुन्हा एकदा ही जबाबदारी नव्याने पेलण्यासाठी सिद्धार्थ सज्ज आहे.
‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’ हा कार्यक्रम सिद्धार्थसाठी खूपच खास आहे.