रोहित कणसे
जगभरात मद्या पिणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय, दारू पिल्यावर लोक वेगवेगळ्या गोष्टी बरळू लागतात, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की असे का होते?
जास्त प्रमाणात दारू पिल्यानंतर लोक इंग्रजी बोलू लागतात, किंवा असबद्ध गोष्टी बोलू लागतात, आज आपण यामागचं कारण जाणून घेऊयात.
किंग्ज लंडनच्या रिसर्चर्सनी प्रोसीडिंग्स ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायंसेसने यावर रिसर्च केला असून यानुसार दारूच्या सवयीमागे RASGRF-2 नावाचे जीन्स अन् डोपामाइनचे खास कनेक्शन असते.
या दोन गोष्टीं मेंदूमध्ये आनंद आणि मौजशी संबंधीत असतात, म्हणजेच जेव्हा एखादी गोष्टी चांगली वाटते तेव्हा या दोन गोष्टी रिअॅक्ट करतात आणि मेंदु आनंदाचे हार्मोन्स जनरेट करतो.
बऱ्याचदा आपण पाहिले असेल की, दारु पिल्यावर लोक गोष्टी बरळू लागतात, किंवा त्यांना येते तेवढी इंग्रजी बोलू लागतात, हे जास्त दारू पिल्यावरच होते.
तज्ज्ञांच्या मते थोडी दारू पिल्यानंतर येणारी नशा आपल्याला वेगळ्या भाषेत बोलण्यासाठी मदत करते अशी माहिती जर्नल ऑफ सायकोफार्माकोलॉजीमध्ये देण्यात आली आहे.
आरोग्यासाठी धोकादायक असली तरी आपण पाहतो की, दारूची नशा चढल्यावर लोकांमधील भीती कमी होते, आणि ते जास्त आत्मविश्वासाने बोलू लागतता.
दारू पिल्यानंतर लोक पूर्ण आत्मविश्वासाने आपले म्हणणे मांडू लागतात, त्यामुळे त्यांची इंग्रजीबद्दलची भीती देखील लपून जाते आणि ते इंग्रजीत बोलण्याचा प्रयत्न करू लागतात.
श्रद्धा कपूरने तिच्या बॉयफ्रेंडला केले सोशल मीडियावरून अनफॉलो