Anuradha Vipat
अनीस बज्मी दिग्दर्शित २००७ साली आलेला ‘वेलकम’ हा चित्रपट प्रेक्षकांना आजही खळखळून हसवतो आहे.
आता मागच्या वर्षी या फ्रेंचायझीचा तिसरा भाग ‘वेलकम टू द जंगल’ची घोषणा या अनिल कपूर व नाना पाटेकर दोन दिग्गज अभिनेत्यांशिवाय करण्यात आली आहे
ते या चित्रपटात का दिसणार नाही यावर आता नाना पाटेकरांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नाना पाटेकर म्हणाले, “जेव्हा मला उदय भाई या भूमिकेविषयी विचारले होते तेव्हा मी ती भूमिका करण्यास तयार नव्हतो.
पुढे नाना पाटेकर म्हणाले, पण अनीस बज्मी यांनी उदय भाईला माझ्याशिवाय कोणीच न्याय देऊ शकणार नाही. ही भूमिका फक्त मीच करु शकतो, असे आपल्या आईची शपथ घेऊन सांगितले होते.
पुढे ते म्हणाले, “वेलकम हा चित्रपट मी आणि अनिल एकत्र असल्यामुळेच शक्य झाला. अनिलशिवाय हा चित्रपट होणे शक्य नव्हते.
‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाविषयी बोलताना नाना म्हणाले, “अहमद खान दिग्दर्शन करत असलेल्या या चित्रपटात काम करण्याबद्दल आम्हाला विचारण्यात आले होते. पण आम्ही चित्रपटात काम करण्यास नकार दिला. चित्रपटाची कथा एवढी चांगली नाही, त्यामुळे आम्हाला मजा आली नाही.