Sudesh
जगभरात कित्येक मजली इमारती आता पहायला मिळतात.
यातील कित्येक इमारतींमध्ये तेरावा मजला नसल्याचं पहायला मिळतं.
एवढंच काय, तर जगातील कित्येक हॉटेल्समध्ये 13 नंबरची रुम अस्तित्वात नसते.
कित्येक इमारतींच्या लिफ्टमध्ये तुम्ही पाहिलं असेल, की 12 नंबर नंतर 14 नंबरचा पर्याय दिलेला असतो.
याला कारण म्हणजे, 13 नंबरबाबत जगभरात असलेली भीती.
जगातील कित्येक लोक 13 या संख्येला घाबरतात. हा अंक अनलकी किंवा अपशकुनी असल्याची त्यांची मान्यता आहे.
याला खरंतर वैज्ञानिक भाषेमध्ये ट्रिक्सायडेकाफोबिया असं म्हटलं जातं. हा फोबिया असणारे लोक 13 या आकड्यापासून दूरच राहतात.
जगात ही मान्यता असणारे बरेच लोक आहेत. त्यामुळे तेराव्या मजल्यावरील फ्लॅट्सची विक्री अगदी कमी होते. म्हणूनच कित्येक बिल्डर्स इमारतींमध्ये तो मजलाच ठेवत नाहीत.