Sandip Kapde
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करताना भूमीसोबत माणसेही जपली.
जिवाला जीव देणारी माणसे महाराजांनी आपल्या स्वराज्यासाठी कमावली होती.
बाजीप्रभू, तानाजी मालुसरे, मोरारजी यांसारख्या शिलेदारांनी प्राणार्पण करून स्वराज्याची राखण केली.
यसाजी काकडे, सूर्याजी, जीवा महाला आणि संभाजी कावजी यांनी निष्ठेने स्वराज्य सांभाळले.
मात्र, संभाजी कावजी स्वराज्याच्या निष्ठेमध्ये कमी पडला.
संभाजी कावजी शिवाजी महाराजांच्या सुरुवातीपासून सोबत होता.
१६५६ मध्ये जावळ्यांच्या मोऱ्यांविरुद्धच्या मोहिमेत संभाजी कावजींनी रघुनाथ बल्लाळ, कानोजी नाईक आणि महाराजांसोबत भाग घेतला होता.
शाहिस्तेखान महाराष्ट्रात आल्यावर चाकणच्या संग्रामदुर्गावर नजर ठेवली.
किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांनी ५५ दिवस किल्ला लढवला, पण अखेर तो शाहिस्तेखानाच्या ताब्यात गेला.
शाहिस्तेखानाचा दरारा पाहून संभाजी कावजीची नियत फिरली.
भय आणि स्वार्थामुळे संभाजी कावजीने शाहिस्तेखानाची चाकरी स्वीकारली.
शाहिस्तेखानाने त्याला ५०० स्वरांची मनसब देऊन मौजे मलकर गावी नेमले.
संभाजी कावजीच्या गद्दारीबद्दल कळताच छत्रपती शिवाजी महाराज अत्यंत संतापले.
महाराजांनी सरनौबत प्रतापराव गुजर यांना संभाजी कावजीचा बंदोबस्त करण्याचे आदेश दिले.
प्रतापराव गुजरांनी मौजे मलकर येथे संभाजी कावजीवर हल्ला चढवला.
१६७२ मध्ये प्रतापरावांनी शिवाजी महाराजांच्या आदेशानुसार संभाजी कावजींना ठार केले. सभासद बखरीमध्ये याचा उल्लेख आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.