Sudesh
आपल्या अनेक काळ्या कृत्यांसाठी कुप्रसिद्ध असलेला चीन देश आता गाढवांच्या जीवावर उठला आहे.
एका रिपोर्टमध्ये असं स्पष्ट झालं आहे, की चीनमध्ये दरवर्षी लाखो गाढवांची कत्तल केली जाते.
'दि डाँकी सँक्चुरी' नावाच्या संस्थेने दिलेल्या अहवालानुसार, जगात दरवर्षी सुमारे 60 लाख गाढवांची हत्या होते. यात सर्वात मोठा वाटा चीनचा आहे.
याव्यतिरिक्त आफ्रिका, दक्षिण अमेरिका आणि आशियातील काही देशांमध्ये देखील गाढवांची अवैध कत्तल केली जात असल्याचं या अहवालात म्हटलं आहे.
ही कत्तल अशीच सुरू राहिली, तर येत्या पाच वर्षांमध्ये जगातील अर्धी गाढवं नष्ट होतील असं या अहवालात म्हटलं आहे.
गाढवांच्या शरीरातील Ejiao या घटकासाठी चीनमध्ये त्यांची हत्या होते. याचा वापर स्किन केअर, ब्युटी प्रॉडक्स्ट आणि औषधांमध्ये केला जातो.
याला डंकी हाईड ग्लू असंही म्हटलं जातं. गाढवांच्या त्वचेतील कोलेजन नावाच्या घटकापासून Ejiao बनवला जातो.
एजियाओची किंमत सुमारे दीड लाख रुपये किलो एवढी आहे. त्यामुळे चीन प्रसंगी विदेशातून गाढवे आयात करुन याचं उत्पादन घेत आहे.