Anuradha Vipat
जळगावमध्ये नुकतंच महासांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या महोत्सवाला विशेष पाहुणी अभिनेत्री रिंकू राजगुरूने हजेरी लावली होती.
या कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली होती. कार्यक्रम संपल्यानंतर रिंकू जेव्हा बाहेर जात होती, तेव्हा काही चाहत्यांनी तिला धक्काबुक्की केली.
त्यामुळे रिंकू चांगलीच भडकली होती. ‘या जागी तुमची मुलगी असती तर चाललं असतं का’, असा प्रश्न रिंकूने त्या चाहत्याला केला.
रिंकूचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे.सैराट’नंतर रिंकूने इतरही काही चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडली.
काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘झिम्मा 2’मधील तिच्या भूमिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली.
जळगावमधील या कार्यक्रमात रिंकूने ‘सैराट’मधील तिचा लोकप्रिय डायलॉगसुद्धा म्हणून दाखवला होता.