Anuradha Vipat
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.
लग्नाच्या 8 वर्षांनंतर उर्मिला पती मोहसिन अख्तर मीर याला घटस्फोट देणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
उर्मिला आणि मोहसिन अख्तर मीर यांच्या घटस्फोटाबद्दल जाणून चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.
2016 मध्ये उर्मिला आणि मोहसिन अख्तर मीर यांनी लग्न केलं होतं
एका दिलेल्या मुलाखतीत मातृत्वावर उर्मिलाने मोठं वक्तव्य केलं होतं.
उर्मिला म्हणाली होती, आई होण्याचा विचार मी करत आहे आणि नाही देखील, प्रत्येक महिलेसाठी आई होणं फार महत्त्वाची गोष्ट आहे.
पुढे उर्मिला म्हणाली होती, मातृत्व योग्य कारणांसाठी असावं. मला मुलं आवडतात. पण अशी अनेक मुलं आहेत ज्यांना आपल्या प्रेमाची आणि काळजीची गरज आहे. स्वतःचीच मुलं असली पाहिजे असं काहीही नाही