ऋषिकेश साळवी (Rushikesh Salvi)
अलीकडे आलेल्या डिजिटल घड्याळ्यांमध्ये वेळ दाखवणारी काटे नसतात, आकड्यांनी वेळ दाखवली जाते.
आपल्या दिवसाची सुरुवात सूर्योदयाबरोबर हाेते, त्यानंतर किती वेळ उलटून गेला हे समजून घेण्यासाठी पहिल्यांदा वाळूचं घड्याळ तयार करण्यात आलं.
घड्याळ्यातील सगळे काटे डावीकडून उजवीकडे का फिरतात याचं कारण आपण जाणून घेऊया.
सूर्य पूर्वेला उगवताे त्यामुळे कोणत्याही वस्तुची सावली पश्चिमेच्या बाजूला पडते. दिवसभरात तिचा प्रवास पश्चिमेकडून पूर्वेकडे असा होताे.
पश्चिम दिशा नकाशात डावीकडे दाखवली जाते, म्हणजे त्या सावलीचा प्रवास हा डावीकडून उजवीकडे होताे.
दिवसातली वेळेचा कालावधी टळण्याचा आणि सावलीचा प्रवास डावीकडून उजवीकडे होण्याचा संबंध घड्याळ बनवताना जाेडला आहे.
भारतातील एका घड्याळाचे काटे फिरतात उलट्या दिशेने त्या घड्याळाला गोंडवाना टाइम म्हणून ओळखलं जातं.