कार्तिक पुजारी
ब्रेकअपनंतर अनेकजण नैराश्यात जातात. काहींना व्यसन देखील जडतं. काही जण तर टोकाचा विचार करतात
याउलट काहीजण ब्रेकअप नंतर स्वत:ला चांगल्या पद्धतीने सांभाळतात आणि आयुष्यात यशस्वी होऊन दाखवतात
ब्रेकअपमुळे खरंतर खूप त्रास होतो, पण आपण परिस्थिती स्विकारली अन् मुव्हऑन केलं तर अनेक गोष्टी साध्य होतात
पुढच्या व्यक्तीच्या निर्णयाचा आदर आणि समोरच्या व्यक्तीच्या भावना समजून घेतल्या तर मनात कटूपणा राहत नाही, त्यामुळे पुढे जाण्यात अडचण येत नाही
ज्या कारणामुळे आपल्याला नाकारलं गेलं, त्या गोष्टीपासून दूर राहून स्वत:ला सिद्ध करण्याचा काही लोक प्रयत्न करतात
अनेकजण रिजेक्शनंतर आपल्या करिअरच्या मागे लागतात, त्यासाठी पूर्णवेळ देतात आणि यशस्वी होतात
ब्रेकअपनंतर काहीजण काहीतरी करून दाखवायचं या विचाराने पछाडले जातात. मात्र, या सर्व गोष्टी व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर अवलंबून असतात