Anuradha Vipat
हनुमानाचा शेंदुराने शृंगार केला जातो यामागे एक रोचक कहाणी आहे ती पाहूयात
एकदा हनुमानाला भूक लागली तर ते भोजनासाठी सीता मातेकडे गेले.
तेव्हा त्यांनी माता सीतेला कुंकू(सिंदूर) लावताना बघितले तर त्यांनी हैराण होऊन विचारले की माते आपण कुंकू का लावता? तेव्हा सीतेने सांगितले की हे शेंदूर आहे आणि हे लावल्याने आपल्या स्वामीचे आयुष्य वाढतं.
हे ऐकल्यानंतर हनुमानाने विचार केला की चिमूटभर शेंदुराने स्वामींचं आयुष्य वाढतं तर पूर्ण शरीरावर शेंदूर लावल्याने आपले स्वामी श्रीराम अमर होतील.
तेव्हा हनुमानाने संपूर्ण शरीरावर शेंदूर लावून घेतले आणि प्रभू श्रीरामाच्या सभेत पोहचले
तेव्हा त्यांनी हनुमानाला वरदान दिले की जो कोणी मनुष्य मंगळवार आणि शनिवार हनुमानाला तुपासह शेंदूर अर्पित करेल त्यावर स्वयं रामाची कृपा राहील
आणि त्याच्या सर्व अडचणी दूर होतील.म्हणून हनुमानाच्या मूर्तीला शेंदूर लावतात
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.