ऋषिकेश साळवी (Rushikesh Salvi)
माझ्या आईने एकही वारी चुकवली नाही. मीसुद्धा गेली पंधरा वर्षे वारी करते आहे. पाय दुखत असूनही मी वारीला यायचे ठरविले. आता पाय दुखतो असा विचारही मनात येत नाही. पांडुरंगाने सर्वांना चांगली बुद्धी द्यावी. सर्वांचे कल्याण करावे.
मी 35 वर्षांपासून वारी करतो आहे. वारी केल्यावर मन प्रसन्न होत. त्यामुळे आम्हाला आनंद वाटतो. माणसाचा जन्म कशासाठी झाला? माणुसकीचा कार्य काय? अशा गोष्टी वारीतून शिकता आल्या.
माउलींचे दर्शन घेऊन पुढे पंढरीला जायचे. वाटेत काही कमी पडत नाही. वारीमध्ये घरची आठवणसुद्धा येत नाही. वारी झाल्यावर घरी गेल्यावर टाळ-मृदंग, वीणा भजन आणि कीर्तनाचा आवाज आठ ते दहा दिवस डोक्यात घुमत राहतो.
वय झाल्यामुळे पाय दुखतात, चालणं होत नाही, दमा आहे, थकवा येतो. त्यामुळे वारीला कोणी घेऊन येत नाही. वारी निघाली की घरी बसावेसे वाटत नाही. तरीपण मी वारीला आले आहे.
गेली वीस वर्षे झाले मी न चुकता दिंडी करीत आहे. त्यातील पाच वर्षे विना चप्पल वारी केली. एकाही दिंडीत कधी कोणते दुखणे आले नाही.
मी निफाड तालुक्यातील असून गेली १५ वर्षे वारी करीत आहे. मनात असेल तर वारी पूर्ण होतेच, हा माझा दरवर्षीचा अनुभव आहे. मी शेतकरी असून गावकऱ्यांसोबत वारीत सहभागी झालो.
लाखो भाविक भक्तिरसात न्हाऊन निघत असलेला हा दिंडी सोहळा भारताशिवाय इतर ठिकाणी कुठे होत असेल असे वाटत नाही. ही आपल्या संस्कृतीची खासीयत आहे. गेल्या आठ वर्षांपासून वारी करीत आहे, आयुष्याला अनोखे सुख देणारा हा अनुभव मी दरवर्षी वारीच्या निमित्ताने अनुभवतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.