Saisimran Ghashi
आजकालच्या धावपळीच्या जीवनात आपण अनेकदा टेबल-खुर्च्यावर बसून घाईघाईने जेवणं संपवतो. पण तुम्हाला माहित आहे का, जमिनीवर बसून मांडी घालून जेवण्याचे अनेक फायदे आहेत?
आपल्या भारतीय संस्कृतीत आपले पूर्वज आणि घरातील इतर वडीलधारी मंडळी छान मांडी घालून, जमिनीवरच जेवायला बसायचे, याचा थेट संबंध आपल्या आरोग्याशी होता.
मांडी घालून जेवल्याने अन्न नीट पचतं आणि अपचन, गॅस सारख्या समस्या कमी होतात.
या आसनात बसल्याने रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि हृदयावरचा ताण कमी होतो.
पाठीचा कणा सरळ,ताठ राहिल्याने मणक्याला आधार मिळतो आणि वेदना कमी होतात.
जमिनीवर बसून जेवल्याने शरीराची हालचाल कमी होते ज्यामुळे अन्न हळूहळू पचतं आणि जास्त खाण्यापासून रोखते.
या आसनात बसल्याने मांडीवर आणि गुडघ्यावर ताण येतो ज्यामुळे मांसपेशी मजबूत होतात.
एकत्र बसून जेवल्याने कुटुंबातील सदस्यांमधील बंध मजबूत होतात आणि प्रेम वाढतं.
शांतपणे आणि योग्य आसनात बसून जेवल्याने एकाग्रता वाढण्यास मदत होते.
तर मग आजपासूनच जमिनीवर बसून जेवण्याचा प्रयत्न करा आणि निरोगी,आनंदी जीवन जगा!