Saisimran Ghashi
झोप शरीराच्या पुनरुज्जीवनासाठी अत्यावश्यक असते, ज्यामुळे आपले शरीर आणि मन ताजेतवाने होते.
रात्रभर श्वसन प्रणालीवर बदलणाऱ्या तापमानाचा परिणाम होतो, ज्यामुळे नाक गच्च होण्याची शक्यता वाढते.
थंड किंवा कोरड्या हवेत झोपल्यास नाकातील श्लेष्मा सुकतो, ज्यामुळे सकाळी नाक गच्च झाल्यासारखं वाटू शकतं.
घरातील धूळ, पलंगावरील उश्या किंवा पाळीव प्राण्यांमुळे अॅलर्जी होऊ शकते, ज्यामुळे नाक गच्च होते.
सायनस इन्फेक्शनमुळे नाकात दबाव जाणवतो, ज्यामुळे सकाळी उठल्यानंतर सर्दीचा त्रास होऊ शकतो.
पाठिवर झोपल्याने नाकात श्लेष्मा जमा होतो, त्यामुळे नाक गच्च होऊ शकते.
रात्रीचे तापमान कमी झाल्यामुळे नाक गळण्याचा आणि गच्च होण्याचा अनुभव येऊ शकतो.
बेडरूम स्वच्छ ठेवणे, धुळ-कण कमी करणे आणि योग्य तापमान ठेवणे, हे नाक गच्च होण्यापासून बचाव करू शकते.