Saisimran Ghashi
आरामदायक आणि पुरेशी झोप आरोग्यदायी जीवनासाठी अत्यावश्यक आहे, जी शरीर आणि मन ताजेतवाने ठेवते.
झोपेतून उठल्यानंतर डोकेदुखी येण्याचे अनेक कारणे असू शकतात, त्यात व्हिटॅमिनची कमतरता हा एक महत्त्वाचा घटक आहे.
व्हिटॅमिन डीची कमतरता असलेल्या व्यक्तींना सकाळी उठल्यानंतर डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो, कारण व्हिटॅमिन डी मेंदू आणि तंत्रिका तंत्रास मदत करते.
बी12 ची कमतरता मुळे मानसिक थकवा, तणाव, आणि डोकेदुखी होऊ शकते. यामुळे झोपेवर परिणाम होतो आणि सकाळी डोकेदुखी होते.
स्लीप अप्नियासारखे विकार असल्यास झोपेत श्वास घेण्यास अडचण येते, यामुळे सकाळी डोकेदुखी होते.
रात्री कॅफिन किंवा मद्यपान घेतल्यास शरीरावर परिणाम होतो, ज्यामुळे सकाळी डोकं दुखू शकतं.
चुकीच्या पोजिशनमध्ये झोपल्याने मणक्यावर ताण येतो, ज्यामुळे सकाळी डोकेदुखी जाणवते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. जर तुम्हाला वारंवार सकाळी उठल्यावर डोकेदुखीचा त्रास होत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि आवश्यक ते व्हिटॅमिन सप्लिमेंट्स घ्यावेत.