Anuradha Vipat
आपल्याकडे पूर्वी युद्धावर जाणार्या योद्ध्याला हातावर दही देऊन निरोप देण्याची परंपरा होती
याच अपेक्षेने भारतामध्ये जेव्हापासून घरातला विद्यार्थी परिक्षेला जाऊ लागला, तेव्हा त्याने त्या परिक्षामध्ये त्या युद्ध्याप्रमाणे यश मिळवून यावे यासाठी त्याच्या हातावर दही दिले जाते
तसेच यामागे वैद्यकिय कारण देखील आहे , दही आपल्या शरीराला नैसर्गिकरित्या थंडावा देतो.
दह्यामुळे उष्णतेशी लढण्याची क्षमता वाढते. साखरेमुळे पुराशाप्रमाणात ग्लूकोज मिळते.
दहीसाखर एकत्र करून खाल्ल्याने मन शांत आणि एकाग्र होतं. त्यामुळे कार्यक्षमतेत वाढ होते. म्हणूनच लोक याला शुभ मानतात.
पोटाबरोबरच दह्यामुळे दातांच्या समस्यांपासूनपण सुटका मिळते