Pranali Kodre
इमोजी आता आपल्या आयुष्यात मेसेज करताना सवयीचा भागच झालेत.
इमोजीमुळे आपल्याला अनेकदा मेसेज, चॅटमधून भावना काय आहेत, हे समोरच्याला सांगता येते.
पण, तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का की बऱ्याच फेस/स्माईली इमोजी पिवळ्या रंगाच्याच का असतात?
खरंतर याचं तज्ञांनी विशेष असं उत्तर दिलेलं नाहीये, पण अनेकांनी यावर अंदाज व्यक्त केले आहेत.
पिवळा हा रंग आनंदाचं प्रतिक आहे म्हणून स्माईली या पिवळ्या रंगाच्या आहेत, असं काहींचं म्हणणं आहे.
काहीच्या म्हणण्यानुसारा पिवळ्या रंगात चेहऱ्यावरील भाव उठून दिसतात, म्हणून इमोजी या रंगाच्या असतात.
काहींच्या मते पिवळा रंग हा आपल्या त्वचेच्या रंगाशी मिळता जुळता असल्याने फेस इमोजी या पिवळ्या रंगाच्या आहेत.
याशिवाय काहींच्या मते पिवळा हा रंग डोळ्यांना त्रास देत नाही. तो खूप भडकही नाही आणि खूप गडदही नाही.