Saisimran Ghashi
मजबूत आणि घनदाट केस सौंदर्य खुलवणारे आणि आत्मविश्वास देणारे असतात मग केस लहान असो वा मोठे.
केसांच्या मुळांना पोषण पोहोचविण्यासाठी विटॅमिन डी अत्यावश्यक असते.
विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे टाळूच्या त्वचेत नवीन केस पेशी निर्माण होण्याची प्रक्रिया मंदावते.
विटॅमिन डी मिळविण्यासाठी सूर्यप्रकाश हा सर्वोत्तम स्रोत आहे.
मासे, अंडी, मशरूम यासारखे आहार विटॅमिन डीचा चांगला स्रोत आहेत.
टाळू स्वच्छ ठेवल्यास केसांना अधिक पोषण मिळते व विटॅमिन डीचा प्रभाव वाढतो.
नियमित व्यायाम, ताज्या हवा घेणे आणि नैसर्गिक प्रकाशात वेळ घालवणे महत्त्वाचे आहे.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार विटॅमिन डी सप्लिमेंट्स घेणे फायदेशीर ठरू शकते.