कार्तिक पुजारी
घटस्फोटाला आता पूर्वीसारखं फार मोठी गोष्ट म्हणून पाहिलं जात नाही. याबाबत सामाजिक निकष बदलल्याचं पाहायला मिळतं.
पूर्वी अनेक महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम नव्हत्या, पण आता त्या स्वत:च्या पायावर उभा ठाकत आहेत. त्यामुळे वैवाहिक जीवनात त्रास होत असेल तर वेगळे होतात.
सध्या समाजात व्यक्तीकेंद्रीतपणा वाढला आहे. व्यक्ती स्वत:च्या आनंदाला जास्त महत्व देत आहे
संवादाचा अभाव हे घटस्फोटाचे प्रमुख कारण ठरत आहे. संवादाच्या माध्यमातून अनेक गोष्टींवर तोडगा काढला जाऊ शकतो
चित्रपट, सोशल मीडियाच्या प्रभावामुळे आपल्या जोडिदाराकडूच्या अपेक्षा प्रचंड वाढल्या आहेत. वास्तव जगात त्या पूर्ण होत नसल्याने लोक घटस्फोट घेत आहेत
डिजिटल युगामध्ये लग्नबाह्य संबंधात वाढ झाली आहे. हे देखील घटस्फोटाचे कारण ठरत आहे. याशिवाय अवास्तव अपेक्षा जोडिदाराकडून वाढल्या आहेत
उशिरा लग्न केल्यामुळे अनेकांच्या आधीच काही सयवी निर्माण झाल्या असतात. शिवाय एकटे राहण्याची सवय झाली असते. त्यामुळे त्यांना जोडीदाराशी तडजोड करणे अवघड जाते