संतोष कानडे
पुण्यामध्ये बुधवारी हेलिकॉप्टर अपघात झाला. या अपघातामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
हेलिकॉप्टरचे अपघात नेमके का होतात, हे पाहाणंदेखील महत्त्वाचं आहे
१. देशामध्ये ४० टक्के हेलिकॉप्टर अपघात हे पायलटच्या चुकीमुळे होतात, हे अभ्यासाअंती स्पष्ट झाले आहे
२. १९ टक्के हेलिकॉप्टर अपघात हे प्रतिकूल हवामानामुळे होतात.
३. ९ टक्के अपघात हे दुर्गम भागातील डोंगराळ प्रदेशांमध्ये होतात. तिथे असलेल्या युटिलिटी केबल्समुळे हे अपघात होतात.
४. ज्या भागात युटिलिटी केबल्स अथवा तारा असतात तिथे सावधानतेचा इशारा देणारी कुठलीही यंत्रणा नसते.
५. व्यावसायिक हेलिकॉप्टरमध्ये होणारे ८५ टक्के अपघात हे दिवसाच्या उजेडात झालेले आहेत.
यात सागरी उड्डाणावेळी आणि हेलिकॉप्टर उतरत असताना अपघात झाले आहेत.
भारतामध्ये होणाऱ्या हेलिकॉप्टर अपघातांच्या कारणांमध्ये उड्डाण परवाना आणि प्रशिक्षण निकष पाळले जात नसल्याचं निदर्शनास आलेलं आहे
आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संघटनेच्या सुरक्षा निरीक्षण ऑडिटमध्ये ही माहिती पुढे आलेली होती