Pranali Kodre
आयस्क्रिम खायला जवळपास सर्वांनाच आवडते. आता तर आयस्क्रिम वेगवेगळ्या फ्लेवरमध्येही मिळतात.
प्रत्येकाने एकदा तरी आयुष्यात आयस्क्रिम खाण्याचा अनुभव घेतलाच असेल. पण कधी विचार केलाय का की आयस्क्रिम खाल्ली की बऱ्याचदा तहान का लागते?
त्यामागील कारण असं की आयस्क्रिममध्ये साखर आणि मीठ असते. या दोन गोष्टी तहान लागण्याला कारणीभूत असतात.
आयस्क्रिम खाल्ली की त्यातील साखर रक्तात मिसळते आणि त्यातील ग्लुकोज वाढते.
त्यामुळे रक्तातील साखर पुन्हा सामन्य करण्यासाठी शरिरातील पेशी युरिन उत्पादन करतात, ज्यामुळे शरिराला पाण्याची कमतरता भासू लागते आणि त्यामुळे पेशी मेंदूला त्याबाबत सिग्नल पाठवतात. मेंदूमध्ये तहान नियंत्रित करणाऱ्या भागाला हपोथॅलामस म्हणतात.
तसेच मीठामध्ये पाणी शोषून घेण्याची क्षमता असते. त्यामुळे जेव्हा तुम्ही मीठ खाता, तेव्हा तुम्हाला तहान लागते.
दरम्यान, आयस्क्रिम खाल्ल्यानंतर काही वेळ थांबून मग पाणी प्यावे, जर लगेचच पाणी पिले, तर घसा खवखवण्याचा त्रास होऊ शकतो.
(डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.)