Pranali Kodre
भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगटने मंगळवारी महिलांच्या ५० किलो फ्रिस्टाईल प्रकारात अंतिम फेरीत धडक मारली होती.
मात्र बुधवारी सकाळी तिचे वजन १०० ग्रॅमने जास्त भरल्याने अपात्र ठरवण्यात आले. त्यामुळे तिचे पदकही हुकले.
खरंतर विनेशने यापूर्वी ५३ किलो वजनी गटात अनेक मोठे विजय मिळवले आहेत, परंतु पॅरिस ऑलिम्पिकसाठी ५० किलो वजनी गटात ती का खेळली, असा प्रश्न अनेकांना पडला.
खरंतर पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताची कुस्तीपटू अंतिम पांघलने आधी ५३ किलो वजनी गटात पात्रता मिळवली होती. त्यानंतर विनेशने तिचा वजनी गट कमी करण्याचा निर्णय घेतला होता.
याशिवाय तिने विनेशने भारताच्या ट्रायल्समध्ये ५० किलो वजनी गटात विजय मिळवला होता. पण तिला ५३ किलो वजनी गटात उपांत्य सामन्यात पराभूत व्हावं लागलं होतं. त्यानंतर ती ५० किलो वजनी गटातून खेळली.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की विनेशने यापूर्वीही ५० किलो वजनी गटात कुस्ती खेळली आहे. तिने या वजनी गटात खेळताना २०१८ मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत, आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे.
मात्र, गेल्या काही वर्षात ती ५३ किलो वजनी गटात खेळत होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.