दारू पिण्यासाठी परवाना का गरजेचा आहे? काय आहेत मद्यपान करण्याचे नियम

अंकिता खाणे (Ankita Khane)

मद्यपान करणे शरीरास हानिकारक आहे, असे वारंवार सांगितले जाते. मात्र, मद्यपान करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. तुम्ही सर्रास कोणत्याही परवानगीशिवाय दारू पित असेल तर हे तुमच्या अंगलट येऊ शकते.

दारू पिण्यासाठीही काही नियम राज्य उत्पादन शुल्क विभागाने घालून दिले आहेत. हा परवाना काढण्याची प्रक्रिया काय असते? तेच आज आपण जाणून घेणार आहोत.

एकीकडे वयाची १८ वर्षे पूर्ण होताच तरुण-तरुणींना मतदानाचा अधिकार मिळतो. आपल्या लोकप्रतिनिधीला निवडून देण्याचा हक्क त्यांना मिळतो.

तसेच १८ वर्ष पूर्ण होताच वाहन चालविण्याचा परवानाही दिला जातो. तसेच २१ वर्ष पूर्ण होताच लग्न करण्याची मुभा असते.

मग, या वयात मद्यपान करण्याची मुभा का नसते? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडत असेल. पण, त्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने काही नियम घालून दिले आहेत.

काय आहेत मद्यपान करण्याचे नियम? -

मद्यपान करण्यासाठी शासनाकडून परवानगी मिळते. मात्र, त्यालाही काही निर्बंध आहेत. ५ टक्के किंवा त्यापेक्षा कमी अल्कोहल असणारी माइल्ड बियर, बिझर पिण्यासाठी वयाची २१ वर्ष पूर्ण करणं गरजेचं आहे.

बिझरमध्ये अल्कोहोल नसते, असं अनेकजण म्हणतात. पण, त्यातही ४.८ टक्के अल्कोहोल असतेच. पण, वयाची २१ वर्ष पूर्ण केली असेल तर तुम्ही बिअर किंवा बिझरचे सेवन करू शकता.

मद्यपान करण्यासाठी २५ किंवा त्यापेक्षा अधिक वय असणे गरजेचे आहे. पण त्यासाठी मद्यसेवन परवाना (लायसंस) गरजेचा असतो. तो नसेल तर तुम्ही अधिकृरित्या मद्यपान करून शकत नाही.

वर्धा, गडचिरोली हे जिल्ह्यातील नागरिकांना हे नियम लागू नाहीत. कारण या जिल्ह्यांमध्ये दारूबंदी आहे. याठिकाणी फक्त वैद्यकीय शिफारशीनुसारच मद्यसेवन करता येते.

मद्यपानासाठी परवाना का गरजेचा असतो? -

अनेकजणांना मद्यपान करण्यासाठी परवाना लागतो, हे देखील माहिती नसते. मात्र, कोणत्याही प्रकारच्या मद्याची विक्री किंवा सेवन करण्यासाठी त्याला परवान्याची गरज असते.

मद्यसेवन करण्याच्या परवान्यानुसार तुम्हाला दारू पिण्याची क्षमता ठरवून दिलेली असते. मद्य खरेदी करताना तुम्हाला तुमच्याकडे असलेले लायसन्स दुकानात दाखविणे गरजेचे असते. मात्र, मद्य खरेदी करणाऱ्यांपैकी जवळपास ८० टक्के नागरिकांकडे परवानाच नसतो.

मद्यसेवनाचा परवाना काढणे म्हणजे स्वतःची प्रतिमा मलीन होणे, असे गैरसमज आहेत. त्यामुळे अनेकजण हा परवाना न काढताच मद्यपान करताना दिसतात.

मात्र, नागरिकांचा संकोच लक्षात घेता सरकारने गेल्या २०१७ पासून मद्यसेवनाचा परवाना ऑनलाइन काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. हा परवाना एका दिवसाचा, एका वर्षाचा किंवा आयुष्यभराचा देखील असू शकतो.

हा परवाना मिळविण्यासाठी वैद्यकीय अहवालाची आवश्यकता असते. शरीराला मद्यसेवनाची गरज असल्याचा दाखला डॉक्टरांनी दिला असेला तर, परवाना दिला जातो.

कसा काढायचा परवाना? (How To Apply For Liquor License?) -

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या https://exciseservices.mahaonline.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या. त्याठिकाणी सर्विसेसची यादी दिसेल, त्यावर क्लिक करावे. त्यानंतर तुम्हाला कुठला परवाना पाहिजे ते निवडून त्यासाठी ऑनलाइन अर्ज दाखल करायचा.

ऑनलाइन अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे -

डिजिटल फोटो आणि सही

ओळखपत्र (आधारकार्ड, व्होटर आयडी)

रहिवासी दाखला

कायमच्या परवान्यासाठी एक हजार रुपये, तर वर्षभराच्या परवान्यासाठी १०० रुपये शुल्क आकारले जाते.

वारंवार उकळ्याने चहाचं होऊ शकतं विष; हिवाळ्यात घ्या विशेष काळजी

tea
येथे क्लिक करा