मधुमेह ते वजन कमी करण्यापर्यंत..; तमालपत्राचे पाणी आरोग्यासाठी का आहे फायदेशीर?

सकाळ डिजिटल टीम

तमालपत्राचे फायदे

स्वयंपाक घरात जेवणाची चव वाढविण्यासाठी तमालपत्र वापरले जाते.

Bay leaf Water Benefits

औषधी मसाला

हा मसाल्यातील पदार्थ ज्याप्रमाणे जेवणाची चव वाढविण्यासाठी मोलाचं कार्य करतो, त्याचप्रमाणं हे आरोग्यासाठी देखील एक उत्तम औषध मानलं जातं.

Bay leaf Water Benefits

तमालपत्रात कोणते घटक?

तमालपत्रात तांबे, अँटी-ऑक्सिडंट्स, कॅल्शियम आणि लोह मुबलक प्रमाणात आढळतात

Bay leaf Water Benefits

मधुमेही रुग्णांसाठी फायदेशीर

तमालपत्राच्या पाण्याचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर मानले जाते. कारण, तमालपत्रामध्ये फायटोकेमिकल्स आढळतात. याचे पाणी सेवन केले, तर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

Bay leaf Water Benefits

जळजळ कमी करण्यास उपयुक्त

शरीरात सूज येण्याची तक्रार असल्यास तमालपत्राच्या पाण्याचे सेवन करणे फायदेशीर मानले जाते. कारण, तमालपत्रात सिनेओल असते. तुम्ही जर तमालपत्राचे पाणी सेवन केले, तर ते जळजळ कमी करण्यास उपयुक्त ठरते.

Bay leaf Water Benefits

वजन कमी करण्यास उपयुक्त

जर तुम्ही देखील तुमच्या वाढत्या वजनामुळे हैराण झाला असाल, तर तुम्ही रोज तमालपत्राच्या पाण्याचे सेवन करणे फार गरजेचे आहे. कारण, तमालपत्राच्या पाण्याचे सेवन केल्याने वजन नियंत्रणात राहते.

Bay leaf Water Benefits

चांगली झोप येण्यास मदत होते

निद्रानाशाची तक्रार असल्यास तमालपत्राच्या पाण्याचे सेवन करणे फायदेशीर मानले जाते. कारण, रोज रात्री झोपण्यापूर्वी या पानाचे पाणी सेवन केल्यास चांगली झोप येण्यास मदत होते.

Bay leaf Water Benefits

साखरेपेक्षा गूळ खरोखरच आरोग्यासाठी चांगला आहे का? जाणून घ्या दोन्हींमधील सत्यता

Health Benefits Jaggery | esakal
येथे क्लिक करा