सकाळ डिजिटल टीम
कॅन्सर हा एक अतिशय प्राणघातक आजार आहे, ज्याचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत.
कॅन्सरच्या उपचारासाठी खूप खर्च येतो, ज्यामुळे अनेक लोक स्वतःवर उपचार करू शकत नाहीत.
अशा स्थितीत अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की, कर्करोगाचा उपचार इतका महाग का आहे?
कॅन्सरचा उपचार महाग होण्यामागे अनेक कारणे आहेत.
कर्करोगाच्या उपचारात वापरण्यात येणारी औषधे प्रगत जैवतंत्रज्ञान वापरून बनवली जातात.
नवीन कॅन्सरची औषधे तयार करण्यासाठी Pharmaceutical कंपन्यांना अनेक वर्षे आणि भरपूर पैसा लागतो.
असा महागडा खर्च नंतर रुग्णांकडून वसूल केला जातो, त्यामुळे उपचाराचा खर्च वाढतो.
कर्करोगाचा उपचार अनेकदा दीर्घकाळ टिकतो, त्यामुळे उपचार अधिक महाग होतात.
जर तुम्ही पाश्चिमात्य देशांमध्ये उपचारासाठी गेलात, तर 5 कोटी रुपयांपर्यंत खर्च होऊ शकतो. त्याचबरोबर भारतातील काही संस्थांमध्ये कमी खर्चात उपचार उपलब्ध आहेत.