सकाळ डिजिटल टीम
सध्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न उफाळून आला आहे. पण, याच कालावधीत बेळगावनं समांतर अशी एक गोड ओळख स्वतःसाठी तयार केलीये.
बेळगावमधील (Belgaum) कुंदा इतका प्रसिद्ध का आहे? हे आपण वेबस्टोरीच्या माध्यमातून जाणून घेऊ..
साठ वर्षांपूर्वी राजस्थानहून इथं येऊन मिठाईचं दुकान चालवणाऱ्या जगन्नाथ पुरोहित या हलवाईकडून मिठाई तयार करताना खवा अधिक भाजला गेला आणि त्याचा रंगही बदलला. आता या मिठाईचं करायचं काय? असा प्रश्न त्याला पडला.
त्या हलवायानं तो खवा आणखी काही तास भाजला आणि या नव्या मिठाईला त्याच्या 'कुंदा' या मुलीचं नाव दिलं. अशाप्रकारे हा कुंदा अस्तित्वात आला.
कुंदा तयार करण्यासाठी शंभर किलो खव्यासाठी तीस किलो साखर वापरण्यात येते. कुंदा तयार होताना सतत ढवळावं लागतं. नाहीतर तो करपू शकतो. कुंदा तयार होण्यास तब्बल तीन तास लागतात.
आज बेळगावमध्ये कुंदा तयार करुन विकणारी शंभरहून अधिक दुकानं आहेत.
राजस्थानमधून इथं येऊन स्थायिक झालेल्या पुरोहित समाजाकडून प्रामुख्यानं हा व्यवसाय केला जातो.
आज बेळगावला गेलेली व्यक्ती कुंदा घेतल्याशिवाय परत येत नाही. एवढी विश्वासार्हता या कुंद्यानं मिळवलीये.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.