Amit Ujagare (अमित उजागरे)
1) राजर्षी शाहू महाराज यांचे मूळ नाव यशवंत जयसिंगराव घाटगे, त्यांचा जन्म कागलच्या घाटगे घराण्यात २६ जून १८७४ रोजी झाला.
2) छत्रपतींच्या घराणाच्या कोल्हापूरच्या गादीचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी १७ मार्च १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले आणि त्यांचं नाव शाहू ठेवलं.
3) २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानचे राजे होते, नंतर त्यांचा मृत्यू ६ मे १९२२ रोजी मुंबईत झाला.
4) राजर्षी शाहू महाराज हे महाराष्ट्राचे रत्न होते, कारण ते खरे लोकशाहीवादी आणि समाजसुधारक होते.
5) ते एक धाडसी राज्यकर्ते होते, त्यांच्या हयातीत भारतात इंग्रजांची सत्ता होती. पण तरीही आपली धोरणं जोरकसपणे राबवली. अस्पृश्य वर्गाला मोठा धीर दिला, त्यांना सन्मानानं जगण्याच्या संधी उपलब्ध करुन दिल्या.
6) जातीभेदानं बरबटलेल्या भारतीय हिंदू समाजात संधी नाकारलेल्यांना मुख्य प्रवाहात येण्यासाठी राजर्षी शाहूंनी पहिल्यांदा आरक्षणाचं धोरण राबवलं.
7) शिक्षण प्रसाराचं मोठं काम करताना कोल्हापूर संस्थानात त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत केलं. देवदासी प्रथा त्यांनी बंद केली. महात्मा फुल्यांचा सत्यशोधक चळवळीचा त्यांनी प्रसार केला.
8) स्त्री-शिक्षण, अस्पृश्यता निवारण, आंतराजीय विवाहाला प्रोत्साहन, शेतकऱ्यांसाठी राधानगरी धरणाची उभारणी, कलाकारांना आणि खेळाडूं प्रोत्साहन देत त्यांनी नवी संस्कृती निर्माण केली.
९) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणासाठी, त्यांचं वृत्तपत्र मूकनायक आणि शिक्षण संस्था उभारण्यासाठी शाहू महाराजांची मोठी मदत केली.
१०) राजर्षी शाहू महाराजांनीच माणगाव इथं भरलेल्या पहिल्या बहिष्कृत परिषदेत बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांनी पहिल्यांदा दलितांचे नेते म्हणून घोषित केलं.