Whale Fish : व्हेल माशाच्या उलटीला कोट्यवधींची किंमत का? जाणून घ्या..

सकाळ डिजिटल टीम

समुद्रातील तरंगतं सोनं म्हणून ओळखल्या जाणार्‍या व्हेल माशाच्या उलटीच्या विक्रीला भारतात, तसंच अमेरिकेत बंदी आहे.

मात्र, तरी देखील अशा प्रकारचं बेकायदेशीर काम केलं जातं. अशा तस्करांवर गुन्हे शाखेकडून कारवाई करण्यात येते.

‘अँबरग्रीस’ असं व्हेल माशाच्या उलटीला म्हणतात. राखाडी अँबर असा याचा अर्थ आहे. हा एक प्रकारचा कचरा आहे, जो व्हेलच्या शरीरातून बाहेर पडतो. आतड्यांमधून हा पदार्थ बाहेर पडतो.

व्हेल मासा समुद्रातील अनेक पदार्थ खात असतो. मात्र, हे पदार्थ त्याला पचत नाहीत तेव्हा तो उलट्या करून बाहेर काढतो.

एक राखाडी किंवा काळा घन अँबरग्रीस आहे. हा एक मेणासारखा घन दगड आहे. याचा वापर परफ्युम्स बनविण्यासाठी केला जातो. अशा परफ्युम ब्रॅन्ड्सला बाजारात कोट्यवधीची किंमत आहे.

काही काळापासून कोकण किनार्‍यावर, तसंच भारताच्या इतर किनार्‍यावर व्हेल मासे आढळून येतात. व्हेलचे दोन प्रकार आहेत. दात नसलेले आणि दात असलेला. ज्या व्हेल माशाचे दात आहेत त्या माशाच्या उलटीची तस्करी केली जाते.

व्हेलच्या उलट्यांची विक्री हा वन्यजीव कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे.

अशा प्रकरणात वन्यजीव संरक्षण कायदा 1972 च्या कलम 2, 39, 44, 48 (अ), 49 (ब), 57, 51 अन्वये गुन्हा दाखल करण्यात येतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Whale Fish Vomit