कार्तिक पुजारी
पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आमरण उपोषणाला १३ दिवस झाले आहेत.
लडाख या केंद्रशासित प्रदेशासाठी संविधानिक संरक्षण मिळावे
तसेच लडाखमधील पर्यावरणदृष्ट्या नाजूक असणाऱ्या परिसंस्थेचं संरक्षण व्हावा यासाठी ते उपोषणाला बसले आहे.
लडाखमध्ये वाढणारे औद्योगिकरण आणि खाण लॉबी यामुळे लडाखच्या परिसंस्था बिघडेल याची जाणीव वांगचूक यांना आहे.
वांगचुक यांच्या नेतृत्त्वात २५० लोक -१२ °C तापमानामध्ये गेल्या १३ दिवसांपासून उपोषण करत आहेत.
सरकारकडे त्यांनी दोन महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत.
लडाखचा अनुच्छेद सहामध्ये करण्यात यावा आणि लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात यावा या त्यांच्या दोन महत्त्वाच्या मागण्या आहेत